Showing posts with label क्रिकेट. Show all posts
Showing posts with label क्रिकेट. Show all posts

Saturday, May 12, 2018

द्रविडीयन मातृत्व (मदर्स डे स्पेशल)

द्रविडीयन मातृत्व (मदर्स डे स्पेशल)



'टीम'रुपी आपल्या कुटुंबाला नेहमीच स्वतःपेक्षा जास्त प्राधान्य देणारी... कधी ओपनिंग कधी वन डाऊन असं टीमच्या भल्यासाठी स्वतःचे हट्ट नेहमीच बाजूला सरणारी...स्लिप मध्ये सेटल असताना केवळ टीमची गरज म्हणून विकेट कीपिंग करणारी.. थोडक्यात काय तर टीमसाठी वाट्टेल ते करायची तयारी असणारी... आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही गोष्टीचा त्याग करायला तयार असणारी....आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कधीच रिटायर न होणारी.... वेगवेगळ्या रोल्स मधून आपल्या कुटुंबाचं भलं करत राहणाऱ्या भिंतरूपी आईला आजच्या मदर्स डे निमित्त  शुभेच्छा!!
देवरूपी (सगळ्यांचा) बाप आणि संकटांशी सामना करण्याची शक्ती देणारा दादा आपल्या कुटुंबात असताना ही आई हळू हळू जन्म घेत होती... नेहमीच दुय्यम भूमिकेत, दुसऱ्यांच्या सावलीत राहून ती दिवस रात्र काम करायची ... तिचं महत्व आपल्याला जणू माहितच नव्हतं पण तरी गरज पडली कि तिचीच आठवण यायची... पडेल ते काम करणं ही तिची सवयच...गरजेप्रमाणे भूमिका पार पाडायची तिची तयारी असायची.... टीमची आईच ती ... टीमची  काळजी घेता घेता , कधी कधी बाबा अपयशी झाल्यावर मात्र ती पटकन बाबाच्या भूमिकेत शिरायची आणि कुटुंबासाठी देवासारखी धावून यायची ... आपण मोठं होत गेलो तशी तिची व्हॅल्यू आपल्याला जाणवायला लागली... 
कुटुंबासाठी प्रतिष्ठेचा असणाऱ्या  वर्ल्डकपमधलं आत्तापर्यंतचं सर्वात मोठं अपयश तिच्या नेतृत्वाखाली आलं... ती खचली पण डगमगली नाही ..पुन्हा भरारी घ्यायच्या दृष्टींनी तयारी केली.... पण तिला अलगद बाजूला केलं गेलं... नवीन पिढीसाठी तिनी हा बदलसुद्धा हसत हसत स्वीकारला.... पण आई संपली असं वाटत असतानाच तिनी इंग्लंडसारख्या अवघड जागी  पुन्हा तिची उपयुक्तता सिद्ध केली... आईला 'वन डे' पुन्हा बोलावणं आलं पण आता मात्र तिनी पुढच्या पिढीसाठी स्वतःहून रस्ता मोकळा केला आणि स्वतःच्याच स्वयंपाकघरातून बाजूला सारून नवीन सुनांना ओटा रिकामा करून दिला... 
पण आई संपली? नाही ...  शेवटी ती आईच ...ती कधीच रिटायर होत नसते ...  संस्कार करणं हे तिच्या रक्तातच असतं...  ही आई पण तशीच... आपलं कुटुंब अजून समृद्ध करणं हाच तिचा ध्यास हाच तिचा हट्ट.... ह्या हट्टापायीच ही भिंतरूपी आई आता  'इंडिया ए असो किंवा u १९' ..... पुढची पिढी  घडवण्यामध्येच गुंतलेली असते... किटी पार्टी, छंद जोपासणे , भटकणे वगैरे  बाकीचे हजार ऑप्शन्स सहज ओपन असताना मात्र नवीन पिढी घडवण्यासाठी संस्कार वर्ग उघडणाऱ्या ह्या भिंतरूपी आईला मनापासून नमस्कार....  आईची महानता नेहमीच आपल्याला उशिरा समजते , ह्या आईचं पण कदाचित तसंच झालं असावं ...आणि  म्हणूनच पुढच्या पिढीतून माही रूपी बाबा आला , विराट नावाचा दादा पण मिळाला पण अजूनही आपलं कुटुंब आईची रिप्लेसमेंट शोधतंय....  

धन्य तो द्रविड ..धन्य त्याचं मातृत्व!  

--स्वागत पाटणकर

Saturday, January 27, 2018

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे....

तुम्ही-आम्ही अजिंक्य रहाणे.... 

साधारण वर्षभरापूर्वी म्हणजेच गेल्या मार्चमध्ये प्रमोशन मिळालेलं असतं  .... एका मॅचसाठी का होईना पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध अवघड सिरीज आणि त्यात महत्वाच्या टेस्टमॅचमध्ये इंडियन टीमला लीड केलेलं असतं...  अवघड निर्णय आणि धडाकेबाज खेळी करून टीमला मॅच - सिरीजमध्ये जिंकून दिलेलं असतं... एक प्रकारे ती करियरमधली सर्वोच्च मुमेंट असते... सगळं कसं एकदम छान सुरु असतं...
पण कुठेतरी माशी शिंकते... नंतर आलेल्या आयपीएल आणि मग भारतामधल्या टेस्ट सिरीजमध्ये अपेक्षेप्रमाणे बॅटिंग होतं नाही... काहीतरी चुकत असतं.. अख्खी टीम बहारदार परफॉर्मन्स करत असते... पण स्वतःच अपयश सलत असतं... रिलेटिव्हली सोप्पा अपोनंन्ट आणि सोप्या कंडिशन्समध्ये आपल्याकडून धावा होत नाहीयेत हे जास्त त्रासदायक असतं.. साहजिकच अपयशातून बाहेर यायला आपण खूप प्रयत्न करत असतो... एक प्रकारचा  मानसिक त्राण असतो... त्यामुळेच ग्राऊंडबाहेरची मेहनत मैदानात फळ देत नसते ... पुन्हा अपयशच हाती येत असतं...
प्रवीण अमरेकडून टिप्स घेताना 

एकदाच्या त्या मॅचेस वाईट स्वप्नांसारख्या संपतात... पुढची टूर असते भारताबाहेरची अवघड प्रतिस्पर्धी आणि अवघड परिस्थितित... तिकडे पूर्वी चांगला परफॉर्मन्स झालेला असतो पण त्या गोष्टीला आता ४ एक वर्षं झालेली असतात... तिथे गेल्यावर पुन्हा आपला फॉर्म परत आणून गेले ६-७ महिने चिकटलेलं अपयश धुवायचा निर्धार केलेला असतो... टूर आधी असलेला प्रत्येक दिवस मानसिक आणि शारीरिक प्रॅक्टिसमध्ये गुंतला जातो... प्रवीण अमरेसारख्या आवडत्या कोच बरोबर खेळातल्या प्रत्येक बारकाव्यांचा अभ्यास केला जातो.. टूरला निघण्यापूर्वी "कम ऑन , २०१८ माझंच आहे" वगैरे स्वतःला सांगून आत्मविश्वास जागवण्याचा एक प्रयत्न होतो.. उपकर्णधार म्हणून आफ्रिकेत पोचतो ...
पण गेल्या गेल्या शॉक बसतो... पहिल्या दोन मॅचेसमध्ये संघात जागा मिळत नाही... केलेल्या निर्धाराचा चक्काचूर होतोय कि काय ... घेतलेली सगळी मेहनत वाया जाते कि काय भीती वाटायला लागते... 'का असं' हा प्रश्न स्वतःलाच विचारला जातो.. संस्कारच असे असतात कि मन स्वतःलाच दोषी मानतं... बॉण्ड्रीलाईनवर बसून मॅच बघत बघत खिन्न झालेलं मन पुन्हा स्वतःच्या टार्गेटकडे रिडाइरेक्ट करायची अवघड गोष्टसमोर असते... खचायचं नसतं...आपले कष्ट सुरु ठेवायचे असतात... आणि संधीची वाट बघत बसायचं असतं....कुठल्याही बॉलरपेक्षा स्वतःच नकारत्मक मन हे 'फेस' करायला जास्त अवघड असतं...
२ऱ्या टेस्ट नंतर ७ दिवस जातात ... आणि ती वेळ येते... ३ऱ्या मॅच मध्ये खेळायची संधी मिळते ...सिरीज गेलेली असते पण मॅच जिंकणं संघासाठी खूप महत्वाचं असतं... तीक्ष्ण- धक्कादायक भूतकाळ आणि ते खोडायला घेतलेले कष्ट हे एका गोड भविष्य असलेल्या स्वप्नांच्या किटबॅग मध्ये बांधून बॅटिंग साठी उतरतो... आणि तेवढेच निराश होऊन पुन्हा पॅव्हिलिअन मध्ये परततो... टीकाकारांच्या टीका आणि फॅन्सच्या डोळ्यातली डिसपोइन्टमेन्ट स्पष्ट दिसायला लागते... मन अजून खच्ची होतं... सगळं अवघड वाटायला लागतं... अपयश बोचत असतं... ८ महिन्यापूर्वी लीड केलेल्या टीममधून आता आपण कायमचे बाहेर पडतो कि काय अशी भीती वाटायला लागते....
दुसऱ्या इनिंगची वेळ येते .. टीम पुन्हा अडचणीत असते... ह्या वेळेस पिचवर उतरल्यावर आत्मविश्वास देणारी व्यक्ती समोर असते... आपल्याच कॅप्टनच्या तोंडून अग्रेसिव खेळायचा ग्रीन सिग्नल मिळतो... जणू काही तो "जा जिले अपनी जिंदगी" सांगतोय ह्या आवेशात ऑन ड्राइव्ह आणि स्क्वेअर कट आपल्या बॅटमधून मारला जातो... बॅटमधून आलेला तो मंजुळ आवाज निराशावादी डोळ्यांना खाडकन उघडतो... जुने दिवस डोळ्यासमोर येतात आणि वर्तमानाला स्कोअरबोर्डवर झळकवतात....
टीमला स्ट्रॉंग पोझिशनमध्ये नेऊन ठेवणारी एक महत्वपूर्ण इनिंग खेळली जाते... असतात ४८ धावा, ज्या काही वर्षानंतर स्टॅट्समध्ये फारशा गणल्या जात नाहीत... पण ह्या इनिंगचं महत्व टीमला आणि त्यापेक्षा स्वतःला जास्त असतं ...स्वतःच्या त्रुटी दूर करण्यासाठी घेतलेले कष्ट कामास आले ह्याचा आनंद असतो.. मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं हे समाधान देणारं असतं... निगेटिव्ह थॉट्स बाजूला होतात...आणि प्रसन्न झालेलं आपलं मन हे मॅच जिंकल्यावर तिथेच न थांबता पुढच्या चॅलेंजसच्या तयारीला मन लागतं...

भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या करियरमधलं हे एक खूप टफ वर्ष आपण सर्वानीच पाहिलं असेल.. कधी त्याच्यावर टीका आणि कधी कौतुकही केलं असेल... त्यानी काल केलेल्या ४८ धावा ह्या एक आकडा म्हणून  मॅच विनिंगवगैरे नव्हत्या किंवा खूप ग्रेट नव्हत्या... पण गेलं वर्षभरातलं अपयश आणि भविष्यकाळातली गोष्टींची भीती, त्यात मॅच हरण्याची चिंता ह्या सगळ्या विचारांना त्यानी बाजूला ठेवलं आणि अवघड कंडिशन्समध्ये प्रतिस्पर्ध्यावर राज्य करायचं धाडस त्यांनी पेलून दाखवलं...

मी त्याचा फॅन आहे म्हणून एवढं कौतुक नाही किंवा मॅचमध्ये तो काही एकटाच हिरो नाही... छोटे आकडे असलेल्या अशा खेळी भविष्यात विसरून जातात .. पण आपण मात्र खेळ नुसताच न बघता त्यातून बरंच काही आत्मसात करायचं असतं ..खरंतर गेल्या वर्षातल्या चढ उतारामधल्या प्रवासात त्याची ही कालची इंनिंग  तुम्हा-आम्हासारख्या मध्यमवर्गीग नोकरदार वर्गाला खुप काही शिकवून जाणारी आहे... एखादं स्वप्न बघून ते पूर्ण करायला आपण जीवापाड मेहनत घेतो... पण ते स्वप्न पूर्ण करायची संधीच आपल्याकडून हिरावली जाते...'सगळं संपल्याचं फीलिंग येतं' किंवा आपण बऱ्याच वेळा आपल्या करियर मध्ये काही चांगले परफॉर्मन्स देतो.... मग दुसऱ्यांच्याच काय तर स्वतःच्याच स्वतःकडून अपेक्षा वाढतात ... हाय टार्गेट - अवघड अपेक्षा पूर्ण करायला म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतो पण सॊप्या चॅलेंजेसमध्ये अपयशी होतो .. आणि ते दुःख जास्त बोचरं असतं ...कधी कधी करियर संपायची भीती दाखवणारं असतं  ...

त्यामुळेच, जसं कम्फर्ट झोनमध्ये गुरफटून बसायचं नसतं तसंच अशा अवघड सिचुएशन्समध्ये डगमगायचं नसतं ... ह्या कालच्या छोट्या  इंनिंगसारखा छोटा आनंदसुद्धा आपल्या टीमला म्हणजेच कुटुंबाला सुखी ठेवत असतो , मोटिवेट करत असतो... हे नेहमी लक्षात ठेवायचं असतं.... आणि अशाच छोट्या छोट्या प्रसंगात मोठं सुख शोधायचं असतं ... कारण स्वतःच्या आयुष्यात स्वतः अजिंक्य राहायचं  हे फक्त आपल्याच हातात असतं...

-- स्वागत पाटणकर

Thursday, June 15, 2017

मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र

मुंबई किनाऱ्याचा लहरी समुद्र
       ------ स्वागत पाटणकर 

"गांगुली , सचिन आणि मी असे आम्ही पुढच्या महिन्यात होणाऱ्या T २० वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाही... नवीन खेळाडूंना संधी उपलब्ध करून द्या" अशा काहीतरी आशयाचा इ मेल तेव्हाचा कॅप्टन द्रविडनी BCCIला पाठवल्याची बातमी सकाळ सकाळ वाचली होती.... ह्या तिघांशिवाय टीम बनूच शकत नाही वगैरे इमोशनल विचार मनात येत होते आणि  गेल्या  १०-१२ वर्षाच्या क्रिकेटच्या आठवणी मनावर 'फॉलोऑन' लादत होत्या पण त्याचबरोबर 'इंडियन क्रिकेट नीड्स तू मूव्ह ऑन' वगैरे मॅच्युअर विचार ही मनात येत होते (मॅच्युअर विचार इंग्लिशमध्येच कसे काय येतात देव जाणे)... पण अशा विचार येण्यामागे, पहिल्यांदाच होणारा २०-२० ओव्हर्सचा वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा नवीन लूक ह्याबद्दल असणारी उत्सुकता कारणीभूत असावी... टीम अनाऊन्स झाली! युवी, धोनीवगैरे ओळखीचे होतेच. पण एक नाव वाचलं ...... रोहित शर्मा फ्रॉम मुंबई!! "मुंबई क्रिकेट? अर्रे एक नंबर? आपल्याला पहिल्यापासूनच मुंबई क्रिकेटसाठी सॉफ्ट कॉर्नर.. शितावरून भाताची परीक्षा करण्यात आपली पीएचडी.. 
एका फटक्यात ... 'रोहित म्हणजे पुढचा सचिन वगैरे.. शेवटी आपली मुंबई बॅट्समन आहे बॉस' वगैरे बोलून मी हवेत गोळीबार करून टाकला होता!  

टी २० वर्ल्ड कप सुरु झाला...  माझी अनाउन्समेंट त्याच्यापर्यंत पोचली कि काय असं वाटण्याइतकं तो एकदम जबाबदारीने आफ्रिकाविरुद्ध मॅचमध्ये खेळला! पहिल्या काही मॅचेस मध्ये त्याला चान्स मिळाला नव्हता.. पण सेमी फायनलला जाण्यासाठी अशा 'मस्ट विन' गेम मध्ये तो खेळला आणि  ते सुद्धा एक मॅच्युअर प्लेयरसारखा. टीमला गरज असताना आणि परिस्थितीला अनुरूप असा. ४ आउट  ६० अवस्था असताना हा नवखा आला आणि काहीही प्रेशर जाणवू न देता धोनी बरोबर एक अतिशय महत्वाची पार्टनरशिप केली. करियरच्या सुरवातीलाच आपले खांदे मोठठी जबाबदारी उचलण्यासाठीच आहेत हे दाखवून दिलं! आणि सर्वात महत्वाचं होतं - t२० आहे म्हणून उगाचच हाणामारी न करता शांतपणे पीचचा आदर करून ४० बॉल ५० रन्स केले! ह्या सामन्यानंतर पुढे फायनलसुद्धा खेळला..पहिल्या मॅच मध्ये शांतपणे खेळणारा, पाकिस्तान विरुद्ध मात्र आपल्या भात्यामधले विविध फटके मारत होता आणि पुन्हा एकदा टीमला उपयोगी अशा १५ बॉल ३० रन्स काढून आपण एक परिपक्व खेळाडू आहे हे दाखवून दिलं!  ह्या २-२ छोटया पण महत्वपूर्ण इनिंगमुळे धोनीचा काय ... माझाही रोहितवरचा विश्वास वाढला! त्याची बॅटिंग म्हणजे स्वछ नैसार्गिक गुणवत्तेनी वाहणारी, बघितल्या बघितल्या  मन प्रसन्न करणारी नदी आहे ... असं काहीसं मला वाटून गेलं! 

रोहित... तसा जन्मानी बनसोडचा म्हणजे नागपूरकर. पण बालपणापासून मुंबईकरच...आणि तसं ही 'मुंबई क्रिकेटचे' गूण अंगात भिनण्यासाठी मुंबईत जन्म घेणं महत्वाचं नसत.. पण आयुष्यातली पहिली रन किंवा पहिली विकेट ही मुंबईत काढलेली असावी लागते ! मग ती गल्लीमधली असो वा  शिवाजी पार्कवर...!! घरची परिस्थिती अत्यंत साधारण असलेल्या  रोहितच बालपण मात्र गेलं बोरिवलीला, काकाकडे.  तिकडेच लागलेली क्रिकेटची गोडी आणि  शाळेत कोच म्हणून मिळालेले 'लाड' सर अशा २ खांबांच्या आधाराने रोहित नामक खेळाडू घडत गेला... मुंबई क्रिकेटचे संस्कार, साहजिकच आलेला मुंबई क्रिकेट स्पेशल खडूसपणा ,अंडर १९ मधली जोरदार कामगिरी ह्या अशा अनेक गोष्टींमुळे नैसर्गिक गुणवत्तेच्या नदीचा आता समुद्र झाला होता आणि त्याच्या उसळणाऱ्या लाटांचा पहिला अनुभव घेतला तो २००५ साली,  सेंट्रल झोननी! रोहितच्या बॅटमधून १४२ रन्स निघाल्या होत्या!! अर्थातच अससोसिएशन मध्ये त्यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.. पुढच्याच वर्षी म्हणजे २००६ ला इंडिया ए आणि रणजी अशा दोन्ही महत्वाच्या स्पर्धांमध्ये (हो,तेव्हा आयपीएल नसल्यामुळे रणजी ला महत्वाचं मानलं जायचं ) त्याला संधी मिळाली आणि डेब्यू केला. रणजीच्या पहिल्या काही मॅचेस फेल गेल्यानंतर मात्र त्यानी अचानक चंद्रकलेप्रमाणे गिअर वाढवला आणि  गुजरातच्या टीमला 'रोहित-वादळाचा' एक भयानक अनुभव दिला, चौफेर टोलेबाजी करत २०० रन्स मारल्या! समुद्राच्या पोटात कसं अफाट गोष्टी लपलेल्या असतात, अगदीच तसं रोहित कडे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स लपलेले असतात, कुठलाही शॉट खेळल्यावर अर्जुनाच्या धनुष्यातून बाण सुटल्यासारखं वाटत. काहीही असलं तरी रोहितकडे बघताना मात्र बॅटिंग मात्र एकदम सोप्पी गोष्ट आहे वाटून जातं... !

२००६ मध्ये वन डे आणि २००७मध्ये टी २० मध्ये पदर्पण केल्यानंतर हे टीम मध्ये चांगलाच स्थिरावला होता, पण CB सिरीज फायनलला सचिनबरोबर केलेली शतकी पार्टनरशिप त्याच्या करियरमधला माईलस्टोन आहे असा मला फार वाटतं! भारतानं ऑस्ट्रेलियामध्ये ट्राय सिरीज जिंकणं फार क्वचित! त्यात टीम अडचणीत असताना ६६ ची छोटी पण अतिशय महत्वपूर्ण अशी इनिंग खेळून त्यानी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवायचं हे  आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण केलं! त्या पार्टनरशिपमध्ये रोहितची बॅटिंग समोरून बघताना 'पुढची पिढी तयार झाली आहे, आता बॅट सोडायला आपण मोकळे' असं सचिनला नक्कीच वाटलं असेल! 

करियर मध्ये एका मागोमाग भरती सुरु असताना अचानक ओहोटी लागल्यासारखं झालं.. मागून आलेले कोहली आणि रैना हे पुढे गेले. एवढच काय तर २०११ च्या वर्ल्ड कप टीमसाठी सिलेक्शन ही नाही झालं... पण ह्या सगळ्या अपयशानी डगमगेल तो समुद्र कसला... ओहोटीनंतर भरती तर येणारच... काही दिवसांनी इंडियन बॅटिंग लाईन-अप मध्ये 'ओपनर' ची जागा रिकामी होती,, रोहितने त्वरित ती जबाबदारी उचलली... मधल्या फळीचा आता तो ...'आघाडीचा' झाला!! गेल्या १-२ वर्षातला कोरडा दुष्काळ त्यांनी धुवाधार बॅटिंग नी संपवला.... शांत निपचित पडलेला समुद्र खवळला... हरवलेले सगळे शॉट्स बाहेर आले आणि वन डे मध्ये २ डबल सेंच्युरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात १७१ मग टी २० मध्ये १०० अशा अनेक मोठमोठ्या लाटांनी  समोरच्या बॉलरला चोफेर भिजवलं.. लाटा कसल्या एक प्रकारची सुनामीचं होती ती! आणि आता तो खरोखरचाच आपला 'आघाडीचा' बॅट्समन बनलाय!

मग काही ह्या पठठ्यानी मागं वळून पाहिलं नाही... वन डे असो किंवा टी २० किंवा अगदी आयपीएल असो... रोहित शर्मा हा आपला एक महत्वाचा एक्का बनला... रोहित पाहिजेच!! अर्थातच त्याचा फॅन क्लब वाढला, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे फॉलोअर्स वाढले... 
समुद्रासारखाच लहरी असलेला हा रोहित आपल्या चाहत्यांना कधीकधी मात्र भयंकर निराश करतो. अपयश हे प्रत्येक खेळाडूच्या नशिबात असतं पण ज्या प्रकारे कधी कधी हा विकेट फेकतो ते फार आश्चर्यजनक असतं...तिथूनच तो 'ट्रोलर्स'च टार्गेट' बनतो..  मित्राच्या ग्रुपमध्ये कसं एखादा जो जास्त जवळचा वाटतो त्याची जास्त फिरकी घेतली जाते , रोहितचा पण तसंच...  कुठल्याही खेळाडू जेवढा ट्रोल होत नसेल तेवढा रोहितला टार्गेट केलं जातं , त्याची थट्टा उडवली जाते.. पण जे लोकं मस्करी करण्यात पुढे असतात तेच रोहितच्या एखाद्या मोठ्या इनिंग नंतर जास्त खुश असतात! हा लेख लिहिताना सुद्धा त्यानी लहरीपणाची झलक दाखवलीच.. एवढा इन फॉर्म असताना परवा आफ्रिकेबरोबर घाण शॉट मारून आउट झाला आणि आज सेमी फायनलला एकहाती मॅच संपवून दिली! पुण्यातला पाऊस कसा कधी कुठे आणि किती पडेल हे सांगता येत नाही तसंच रोहित कधी काय करेल ह्याचा नेम नाही, कधी कधी कुठले इनोव्हेटिव्ह शॉट्स बाहेर काढून बॉलरला चकित करेल किंवा कधी मिडल स्टंपवरचा बॉल लिव्ह करून स्वतःबरोबरच फॅन्सलापण आउट  करून टाकेल .... कसलाच भरवसा नाही!!

त्याच्या अशाच ह्या लहरीपणामुळे करियरच्या १० वर्षानंतरसुद्धा एवढी गुणवत्ता असलेला मुलगा टेस्ट टीम मध्ये जागा पक्की करू शकला नाही हे  खुपत राहतं .. कोहलीसारखा अग्ग्रेसिव्ह नाही आणि पुजारा एवढा शांत नाही..दोन्हीचं मिश्रण असलेल्या रोहितमध्ये टेस्टमध्ये सुद्धा सुनामी आणण्याची ताकद नक्कीच आहे.. किंबहुना तो असा एक प्लेयर आहे जो एका सेशन मध्ये मॅच सिच्युएशन बदलून टाकेल! 
पण आपल्याला हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळतेच असं नाही! कधी कधी उशिरा मिळते आणि त्या गोष्टीचं महत्व पटतं! रोहित च्या बाबतीत टेस्ट टीममध्ये असंच व्हावं, क्रिकेट नामक किनाऱ्यावर बसलेल्या सर्वाना रोहितनी गार वाऱ्यासारखं प्रसन्न करावं, उंच उंच लाटांनी ओलं करावं आणि आयुष्याच्या इंनिंगमध्ये कायमचा लक्षात राहणार आनंद द्यावा .... हीच सिद्धिविनायकाकडे प्राथर्ना...!!

Saturday, June 3, 2017

भारत * पाकिस्तान + वर्ल्ड कप + मित्र = राडा

४ जून ला भारत पाकिस्तान मॅच साठी काय प्लॅन करावा अशा महत्वाच्या प्रश्नामध्ये मी गुंतलो असताना ,काही सेकंदात मी १५ वर्ष मागे गेलो... अगदी "झापझापझाप" वगैरे टिपिकल फ्लॅशबॅकच म्युजिक ऐकत ऐकतच!!
२००३ वर्ल्ड कप , कॉलेज मधला शेवटचाच वर्ल्ड कप.. दादा,सचिन,द्रविड खऱ्या खुऱ्या 'फॉर्म' मध्ये असतानाचा वर्ल्ड कप. शेड्युल बघितलं , १ मार्चला भारत पाकिस्तान!! बस्स... हे बघून सगळ्यांचे डोळे चकाकले... मॅचला काहीतरी करू, एकत्र बघू धिंगाणा घालू राडा करू अशा एक एक फुलबाज्या फुटायला लागल्या.वर्ल्ड कप मध्ये भारत पाकिस्तान म्हणजे त्यांचा पराभव आणि आपला विजय हा एक नियमच आहे , त्यामुळे मॅच हरलो तर काय वगैरे फालतू प्रश्न पडलेच नाहीत. मॅच एकत्र बघू ह्या गोष्टीवर मात्र शिक्कामोर्तब झालं.नंतर साधारण १०-१२ दिवस झाले, मॅचचा दिवस उगवला..आणि अतिशय बोलबच्चन करून बडबड करणाऱ्या सगळ्यांनी शेवटपर्यंत मॅच साठी प्लॅन केलाच नव्हता, नुसते हवेत गोळीबार. तेव्हा पुण्यात स्पोर्ट्स बार एवढे सुरु झाले नव्हते आणि झाले असतील तरी तिकडे ८-८ तास बसायला खिशात पैशेही नसायचे.. त्यामुळे आता आपापल्या घरी बसा आणि जिंकल्यावर एफ सी रोड ला या असा साधा सोप्पा प्लॅन फायनल केला.. थोडासा निराश होऊनच घरी आलो. पण चीज कॊ दिल से चाहो तो पुरी कायनाथ उसे मिळणेकि कोशिश में लग जाती है असं म्हणतात आणि त्याचा मला याची देही अनुभव आला..घरी आल्यावर बघितलं , आई बाबा घाईघाईत निघाले होते मला म्हणले रात्री उशीर होईल यायला किंवा उद्याच येऊ वगैरे..मी अतिशय निर्लज्ज मुलासारखा त्यांच्यासमोर ओरडलो "बेस्ट, उद्याच या". त्यांनी डोक्यावर हात मारून घेऊन काढता पाय घेतला!
घरात जाऊन रप्पारप पोरांना फोन लावले... तेव्हा मोबाईल वगैरे काही नव्हते , लॅण्डलाइनवरच सगळं. "घरी कोणी नाहीये , दुपारी २.३० ला माझ्या घरी , तारा वर या"! अर्ध्या लोकांना मी फोन केले, बाकीच्यांना अमेयनी . बेस्ट वाटत होतं.. ठरल्याप्रमाणे अमेय आला आणि आम्ही झेंडा,माउंटन ड्यू वगैरे तयारी केली..फुल्ल excitement. रस्त्यावरुन जाताना लोकांमध्ये पण घरी पोचायची घाई दिसत होती..खिशाला परवडेल एवढं खाण्याच्या वगैरे गोष्टी घेऊन घरी आलो. तेवढ्यात टॉस झाला , सेन्च्युरियनच्या आलिशान अशा स्टेडियममध्ये मॅच ! आपले दादासाहेब टॉस हारले, पहिली बॉलिंग आली! , १० ओव्हर झाल्या तरी पाकड्यांची एकही विकेट पडली नव्हती आणि फोनवर हो हो म्हणलेल्यांपैकी कोणीही आलं नव्हतं, जरा बोर झालं होतं ... आम्ही दोघे शांतपणे सकाळवगैरे वाचत बसलो...
तेवढ्यात झहीरनी तौफिक उमर चा एक जोरदार त्रिफळा उडवला आम्ही दोघांनी, घरात खूप गर्दी आहे...आम्ही लै एन्जॉय करतोय असं भासवून स्वतःलाच खुश करण्यासाठी खूप आरडाओरडी केली...आणि एक 'टेम्पो' सेट करायचा प्रयत्न केला..आणि तेवढ्यात घराची बेल वाजली. आमच्या ग्रुपमधील एक से एक वल्ली लोकं - अमोल , अप्प्या ओंकार , सागर dungule , अजिंक्य चुटके दारात उभे होते!! मी हुश्श केलं , जणू काही अक्ख BMCC घरी आल्यासारखं मला वाटलं.. माझ्यासाठी हे ६-७ जण म्हणजे अख्ख BMCC च होतं!! आता पहिली विकेट आणि पोरांची एन्ट्री ह्यांनी जान आणली होती.
"माझे इंजिनीरिंग करणारे काही शाळेतले मित्र आहेत त्यांना बोलावलेलं चालेल का " अमोलनी उगाचच मी किती शहाणा मुलगा वगैरे आहे असं दाखवत परवानगी घ्यायचा प्रयन्त केला ,पोरांनी लगेच अमोलला कोपऱ्यात घेऊन त्याचा क्लास घेतला. कुल्कर्ण्यांनी इंजिनीरिंगच्या मित्रांना बोलावलं,फोन ठेवल्यावर - त्यांना अभ्यास वगैरे असतो येणार नाहीत वगैरे म्हणत बी कॉम वाले पडीक असतात हे दाखवून दिल्याबद्दल पोरांनी अमोलचा पुन्हा एकदा क्लास घेतला...
पण जणू काही "बी कॉम वाले पडीक असतात" हे वाक्य पटवण्यासाठीच दारावर उभे राहिले आमचे BMCC - डहाणूकर अशा २ कॉम्बो कट्ट्यावरची मंडळी..
 सुमीत , आनंद ,परीक्षित ,मिनत्या ,जितू राणे आणि मयुरेश बहिरट .. ते लोकं आत येत नाहीत तो पर्यंत स्वागत पाटणकर इथेच राहतो का वगैरे म्हणणारे ४-५ टाळकी आली..
२-३ मिन बोलल्यावर लक्षात आलं.. अमोलची इंजिनीरिंगची अभ्यास करणारी हीच ती पोरं ... योगेश , पराग , बागड , भुक्या आणि पप्प्या  ह्यांची एंट्री झाली.. योग्या भुकीला आधी बघितलं तरी होतं पण पण पप्प्या, बागड्या आणि पराग चे चेहरे एकदम अनोळखी होते..मनात म्हणलं हरकत नाही ...आपल्याला गर्दी करून राडाच घालायचं.. BMCC , डहाणूकर , इंजिनीरिंग असे वेगवेगळे दिशांचे लोक तारा मध्ये बसून आफ्रिकामधली मॅच बघत होते तरी काहीतरी मिसिंग वाटत होतं... तेवढ्यात आमच्या ग्रुप मधल्या २ मनोरंजक जोड्या आल्या .. एका गाडीवर मितेश  --Rohan बोरावके आणि दुसरीवर अभिषेक -अमित.... अभिषेकने आल्या आल्या खेमराजमुळे उशीर झाला वगैरे काहीतरी बोलून उशीर का झाला ह्या न विचारलेल्या प्रश्नाचा उत्तर द्यायचा निरर्थक प्रयत्न केला... अमित मगरनी मात्र मात्र शांतपणे जिथे रिकामी जागा दिसेल तिकडे जागा घेतली! मागून मितेश आणि बोरावके आले, दारातून आत घुसल्या घुसल्या जमलेली गर्दी बघून - 'आयवोय' एवढिच त्याच्या स्टाईल मधली रिअक्शन दिली' आणि गर्दी कडे बघत बघत आत गेला..बोरावकेनी कोपऱ्यात ठेवलेला झेंडा बरोबर शोधला आणि घेऊन बसला.. अशा प्रकारे गेल्या ३० मिनटात घरातल सगळं चित्रच बदलून गेलं होता , अब्दुल रझाक येऊन आउटपण झाला होता कोणाच ही लक्ष नव्हता .. थोडं नीट बघितल्यावर इंझमाम बॅटिंग ला येताना दिसला , अमेयनी अतिशय आत्मविश्वास दर्शवत, हा भा$%$ जाडा इंझमाम पळणार नाही आणि रन आउट होणार बघा वगैरे बोलून दाखवला.. जमलेल्या २०-२२ लोकांनी त्याला अजिबात प्रतिक्रिया दिली नाही. आणि साधारण पुढच्या ५ मिनटात वगैरे इंझमाम आऊट झाला... ते सुद्धा रन आउट .. अमेय 'मला विचारात जा क्रिकेटबद्दल' ...वगैरे डायलॉग मारून हवा करायचा प्रयन्त करत होता... पोरांनी ह्यावेळेस मात्र त्याला प्रतिसाद दिला आणि इंझी ला भा ची बाराखडी ऐकवली..
नंतर यसुफ योहान आला, ५-६ ओव्हर झाल्या विकेटच पडत नव्हती.. दुसरीकडे सईद अन्वर खूपच भारी खेळात होता. मॅच जरा बोर व्हायला लागली आणि लोकही अजून ओपन अप झाली नव्हती.. अप्पू च्या ते लक्षात आलं... "मी माउंटन ड्यू" आणायला गेलो आणि त्या दुकानातल्या बाई ला "डू द ड्यू" द्या असं बोललो " हे असे अतिशय तयार केलेले विनोद ऐकवून खेळीमेळीच वातावरण करायचा प्रयत्न केला. योगेश जोशींनी दिलेली "हा काय 'वाय झेड' आहे का?" रिअक्शन ऐकून अप्पू ..हा हा वगैरे हसून गार पडला ...मग अमोलनी डी मोंगिया हा किती महान खेळाडू आहे वगैरे फालतू बडबड करून वातावरण पुन्हा हलकं आणि बोलकं करायचा प्रयत्न केला.. BMCC च्या पोरांनी अमोल कसा सध्या उमा उमा करत असतो अशी एक महत्वाची बातमी इंजिनीरिंग च्या पोरांना पुरवली! बस्स झाला तर मग अशा ह्या 'क्रॉस ट्रेनिंग' मुळे सर्व मुलं एकत्रपणे नंदू लागली आणि स्वागतआजोबाना एक समाधान मिळालं. भुक्या ने त्याच्या बोलण्याच्या घाण स्पीडमध्ये उमा हा सोप्पा शब्द सुद्धा घाणप्रकारे कसा उच्चरत येतो ह्याच एक प्रात्यक्षिक दाखवलं...
मिन व्हाईल, योहाना - अन्वर पार्टनरशिप १५ एक ओव्हर्सची झाली, मॅच जाते कि काय भीती वाटायला लागली होती. लोकांचं लक्ष लागत नव्हतं , चलबिचल होत होती.. आमचचा कॅप्टन ओंकार थोरात कंटाळा येऊन बाल्कनी मध्ये गेले ...आणि जादू झाल्यासारखा युसूफ योहान 'सॊफ़्ट आउट झाला. आणि थोरात नी जागा सोडल्याचा परिणाम चाणाक्ष लोकांच्या च्या नजरेतून सुटला नाही..थोरात ला पुढची सगळी मॅच बाल्कनीमधूनच बघण्याचा आदेश देण्यात आला. आफ्रिदी आला ,आल्या आल्या त्यांनी २ चौकार मारले पण काय आश्चर्य! चक्क डी मोंगिया ने त्याला आउट केलं.. घरात डी मोंगिया वरून अमोल आणि अमोलवरून उमा चा जयघोष सुरु झाला ..साधारण पुढची १० मिन उमाच्या नामस्मरणानी तारा दणदनून गेली..
फायनली पाकिस्तानची बॅटिंग संपली .. २७४ टू विन!!!
आपणच ५० ओव्हर्स फिल्डिंग केलीये ह्लअशा आवेशात अख्खी गॅंग स्वीकार वर खायला गेली.. खाऊन घरी पोचलो ते हि परफेक्ट टाइम ला ... सेहवाग नी वकार ला जोरदार ६ मारला थोड्या वेळात तेंडल्या नी अख्तर ला जोरदार ठोकलं , खरा दंगा सुरु झाला. भयंकर आरडाओरडी.छोट्याश्या हॉल मध्ये २५ एक लोक भयांकर आवाज करत होते. तारा हलली होती, ते ऐकून वरचा क्रिकेट पंडित अक्षय  पण आम्हाला जॉईन झाला! दंगा सुरूच!! आणि अचानक सेहवाग आणि गांगुली आउट झाले.. लोकांनी ओंकार ला पुन्हा बाल्कनीमध्ये पाठवले. बहिरट अचानकपणे खालती गेला आणि ५ मिनटात धावत धावत वर आला.. शेजारच्या रिकाम्या प्लॉटवर एक आंब्याचं झाड होतं , त्याच्या कैऱ्या काढून आणल्या होत्या ह्या पट्ठ्यानी!!
थोडं टेन्शन होतं पण सचिन असल्यामुळे निश्चिन्त होतं, सचिन फुल्ल फॉर्मात खेळत आणि अचानक सुमित आणि अंड्या ह्यांना सूर गवसला आणि अतिशय भावनिक कविता त्यांनी केली..
"हा बघ हा , तो बघ हा ... हा बघ तो , तो बघ तो. "असे अतिशय अर्थपूर्ण शब्दांनी कविता सजवली होती.सचिन आणि कैफ सेट झालेत असं वाटत असतानाच आफ्रिदीने कैफ ला बोल्ड केलं आणि त्या क्षणी आफ्रिदीच्या आईचा जयघोष झाला. हे सुरु असताना अचानक बेल वाजली , वॉचमन कंप्लेंट करायला आला होता पण एवढी लोक बघून प्लिज हळू अशी वगैरे रिक्वेस्ट करून गेला. हे अर्थातच हे बघून लोकांनी आवाज डबल केला ... पुन्हा बेल वाजली..आता मात्र ह्या वॉचमनच्या &&&&& वगैरे करत दार उघडला आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. साक्षात सुरजित मॅच बघायला आले होते...आल्या आल्या कोणाची मॅच आहे रे असे अवघड प्रश्न विचारून मेहेंदळे चा क्लास घ्यायचा प्रयत्न केला.. पण हरतील ते मेहेंदळे कसले. ते अख्ख प्रिपरेशन करून आले होते.. आल्या आल्या "अन्वर किती छान खेळला " वगैरे पाठांतर केलेलं वाक्य बोलून दाखवून सर्वाना गप्प केलं.
कैफ आउट झाल्यावर द्रविड आला..आणि पूर्ण मॅचमधलं सगळ्यात जास्त टेन्शन मला तेव्हा आलं... काहीही कर पण आउट नको होऊस एवढीच पार्थना मी करत होतो...जर द्रविड आउट झाला असता तर माझ्याच घरातून मला हाकलूनही देण्यात आलं असतं ..सुदैवानी द्रविडशेवट पर्यंत नॉट आउट राहिला...मॅच जिंकली, ओंकारला बाल्कनी मधून हॉलमध्ये यायला मिळाला, एकच दंगा सुरु झाला.. फटाक्यांपेक्षा जास्त आवाज होता!!!
रोहन बोरवक्यानी इतका वेळ हातात पकडलेला झेंडा शेवटी उंच धरला आणि नाचायला लागला....आणि खळळळ....आवाज झाला. भारताच्या उंचावलेल्या झेंड्यानी आमच्या हॉल मधलं झुंबर फुटलं होतं.... आई बाबा दारात उभे होते!!
पुढच्या १० मिनटात माझ्यासकट सर्वानी एफ सी रोड गाठला ....

Saturday, May 20, 2017

टीम इंडियाचा शहाणा मुलगा - अजिंक्य रहाणे!!

टीम इंडियाचा शहाणा मुलगा!

मनानी कितीही पुणेकर असलो तरी नेहमीच मुंबई क्रिकेटसाठी वेडा होतो...कांबळी,तेंडुलकर,मांजरेकर इथपासून अगदी वासिम जाफर, अमोल मुझुमदार अशा अनेक लोकांमुळे पहिल्यापासूनच रणजी म्हणजे मुंबई क्रिकेट असंच ठरलं होतं. मुंबई - महाराष्ट्र रणजी बघायला तर कमालीची मजा यायची.
असंच एकदा ... साधारण १० वर्षांपूर्वी पुण्याच्या डेक्कन जिमखानावर मुंबई- महाराष्ट्र मॅच होती ! डेक्कन म्हणजे आपलं होम ग्राउंड , सो साहजिकच सिक्युरिटीचा वगैरे लोड नव्हता. मी सकाळी ९ वाजता डायरेक्ट पॅव्हिलियन मध्ये जाऊन बसलो. टॉसची वेळ झाली, 'अवे' टीमच्या रूममधून मुंबईचे प्लेयर्स बाहेर यायला लागले. अजित आगरकर,वासिम जाफर,रमेश पोवार असे 'स्टार' लोकं बाहेर दिसले! मन खुश झालं. मुंबईची बॅटिंग आली, जाफर ओपनिंगला उतरला. मी आपला उगाचच व्ही आय पी पास मिळाल्यासारखा तोऱ्यात बसून सगळीकडे नजर फिरवत होतो.सुरवातीच्या ३-४ ओव्हर्स झाल्यावर पॅव्हिलिअन, प्लेयर्स आणि माझी excitement...सगळंच सेटल झालं.

आगरकर आणि पोवार माझ्याच मागे 'टवाळक्या' करत बसले होते. हे असे प्लेयर्स ड्रेसिंग रूममध्ये असणं टीमसाठी फायदाचं असतं हे तेव्हा कळलं. मला काहीही करून आगरकर बरोबर फोटो हवा होता, मी खूण करूनच अजितकडे फोटोची परमिशन घेतली. जग जिंकल्यासारखं पुढे गेलो आणि त्यांच्या शेजारी धवल कुलकर्णीसारखा दिसणारा बारीक, भयंकर टेन्शन घेतलेला मुलगा दारात उभा होता.  त्याच्या चेहऱ्यावरचा नवखेपणा स्पष्ट दिसत होताआणि ते बघून माझ्यातला पुणेरी स्वभावानी माझा ताबाघेऊन  आणि त्या मुलाला काहीही रिस्पेक्ट न दाखवता त्याला डायरेक्ट कॅमेरा दिला. त्यानीसुद्धा अजिबात रिऍक्ट न होता माझे आगरकरबरोबर  फोटो काढले.. मी 'थँक्स धवल' बोलल्यावर, त्यानी एक स्मित हास्य माझ्यावर टाकलं आणि म्हणाला "मी धवल नाही". त्या आवाजात मला एक प्रकारची निराशा जाणवली. ती निराशा नाव चुकल्याबद्दलची नव्हती, पण मी त्याला मॅच बघताना डिस्टर्ब् केलं ह्याची असावी. पुढच्याच क्षणाला तो ड्रेसिंग रूमच्या दुसऱ्या टोकाला जाऊन एकांतात मॅच बघायला लागला!

मनात चुकचुकल्यासारखं झालं, मी लगेच माझा  स्कोरर मित्र, कपिल खरेला त्याबद्दल विचारल्यावर उत्तर आलं - 'नवीन प्लेयर आहे. अजिंक्य रहाणे.. आज खेळत नाहीये' . मी मान डोलावली आणि पुन्हा मॅच बघायला लागलो....पण मनात एकच विचार पुन्हा पुन्हा येत होता,
हा मुलगा टीम मध्ये नाहीये.. बाहेर आहे... पण तरी एवढ्या एकाग्रतेने मॅच बघतोय! फार वेगळं होतं हे. पुढचे १-२ तास तो त्याच जागेवर, तशीच हाताची घडी घालून जाफरची बॅटिंग फॉलो करत होता. एकदम गुंतून! आजूबाजूला काहीही लक्ष नव्हतं. जर बॅट्समन बीट झाला,चुकला तर हा इथे कोपऱ्यात बसून नर्वस होत होता. बॅटशिवाय नुसतंच डाव्या हाताने बॉल कसा मारला असता हे दाखवत होता- स्वतःलाच.. आणि मला फारच गम्मत वाटत होती हे सगळं बघताना. माझीं नजर आता त्याला फॉलो करत होती.

आयुष्यात बऱ्याच वेळा काही काही गोष्टी, माणसं आपल्याला पहिल्याच भेटीत क्लिक होतात.. पहिली नजरमें प्रेम वगैरे होतं .. हे अगदीच राज-सिमरनवालं प्रेम नसतं पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी ती व्यक्ती पटून जाते. हे असंच काहीसं झालं. हा मुलगा पुढे जाणार असं चटकन वाटून गेलं!

मी त्याला observe करतच होतो तेवढ्यात जाफर आऊट झाला.थोड्यावेळानी बघितलं तर अजिंक्यनी जाफर शेजारची खुर्ची पकडली होती आणि ते दोघ चर्चा करायला लागले होते. मी व्योमकेश बक्षीसारखा हळूच त्यांच्या मागे जाऊन बसलो.. का असा करावंसं वाटलं हे कळलंच नाही.. पण मी गेलो. ते दोघे महाराष्ट्राची बॉलिंग,डेक्कनचं पीच आणि जाफर आऊट झालेला बॉल ह्यावर चर्चा करत होते. मला काहीच सुधरत नव्हतं.हा मुलगा आज काही खेळत नाहीये,बॅटिंग करणार नाहीये पण का एवढा विचार करतोय. टॉस आधी सकाळी त्यांनी पीचचा अंदाज बांधला होता तो कितपत बरोबर आहे हे तो चेक करत होता आणि त्याला समजावून सांगणारा जाफरपण तसाच शांत आणि अभ्यासू. पुढच्या  २०-३० ओव्हर्स जाफर आणि अजिंक्य प्रत्येक बॉल वर कंमेंट आणि पुढच्या बॉलचं प्रेडिक्शन करत होते! मी मनातल्या मनात कोपऱ्यापासून नमस्कार घातला होता. आजोबाना आपल्या नातवाची बडबड ऐकून आनंद होईल तसं वाटत होतं मला. हा मुलगा मोठा खेळाडू होणार एवढंच सारखं सारखं मन सांगत होतं!

मॅच संपली,अजित आगरकरबरोबरच्या फोटोमुळे मेमोरेबल दिवस होईल असं वाटत असतानाच अजिंक्यनी सरप्राइज एंट्री घेतली होती...त्याच्याशी झालेली ही पहिली पण ..एकतर्फी भेट मला खूप आवडून गेली होती!

नंतर साधारण ४-५ वर्षांनी अजिंक्यला भेटायचं पुन्हा योग आला .... ती भेट अशीच, पूर्वीसारखी एकतर्फी! वानखेडेवर टेस्ट मॅच होती... माझ्या वयाबरोबर माझं वजन आणि क्रिकेटवेड पण तेवढंच वाढलं होतं.आमचे स्नेही- यश रानडेंमुळे पॅव्हेलियनच्या शेजारची टिकेट्स मिळाली होती. टेस्ट मॅच पडद्यामागून बघायची ही उत्तम संधीच! गेल्या काही वर्षात सातत्याने रणजीमध्ये परफॉर्म केल्यामुळे अजिंक्यचं इंडियन टीममध्ये सिलेक्शन झालं होतं.अर्थातच सचिन, द्रविड, कोहली, लक्ष्मण असे एक से एक जण असताना त्याला ११ मध्ये खेळण्याची संधी अजिबातच नव्हती.  पण त्याला समोर बघून मस्त वाटलं. मनात म्हणलं 'I KNEW"

पुढचे ५ दिवस मी त्याला बघत होतो. जी चिकाटी,खेळाबद्दलची ओढ,सिन्सीयरनेस त्याचा मी काही वर्षांपूर्वी पहिला होता, तो कैक पटीनी वाढलेला मला दिसला. तेव्हाच्या रोपट्याचं झाड झालेलं दिसत होतं मला. ५ दिवस हा मुलगा बॉण्ड्रीलाईनवर उभा होता. आपली बॅटिंग असो किंवा बॉलिंग, ह्याचा लक्ष सतत फिल्डवर असायचं. खेळणाऱ्या लोकांकडून काही इशारा आल्यास उत्तर द्यायला हा सदैव पहिला असायचा.. आता ह्यावर बरेच जण आक्षेप घेतील - हे प्रत्येक खेळाडू  करतो वगैरे. पण अजिंक्यामध्ये टीमला कुठल्याही प्रकारची मदत करण्यात, काँट्रीब्युट करण्यात समाधान मानण्याची वृत्ती बघितली. त्याच्याबरोबर राहुल शर्मा वगैरे सारखी मंडळी बेंचवर होती पण त्यांची गेम मधली इन्व्हॉल्वमेंट आणि अजिंक्यची ..ह्यात जमीन अस्मानचा फरक होता. तोच फरक आत्ता त्यांच्या करियर मध्येपण रिफ्लेक्ट होतोय.
लंच सुरु व्हायच्या आधी ५ मिन हा पॅडअप होऊन तयार असायचा, लंचब्रेक झाल्या झाल्या ४० मिनीटस प्रॅक्टिस-विकेट्सवर बॅटिंग करत होता... टी टाइम आणि दिवसाचा खेळ संपल्यावर २० मिन फिल्डिंग प्रॅक्टिस..आणि हे असं ५ दिवस!! खेळावरची ही कमिटमेंट बघून मी कमालीचा भारावून गेलो होतो सिन्सीयरनेसचा उच्चांक! आय टी मध्ये काम करत असल्यामुळे लोक 'बेंच' वर असताना किती टाईमपास करतात हे फारच जवळून बघितलं हॉट, लोकं AC रूम मधलं ट्रेनिंग अटेंड करायला पण टाळाटाळ करतात! पण अजिंक्यचं असं नव्हतं, हा 'रिकामा' वेळ तो जास्तीत जास्त शिकायला वापरत होता.

शाळेमध्ये वगैरे काही काही मुलं ही नैसर्गिक टँलेन्टेड नसतात, पहिला नंबर  मिळवणारी पण नसतात, हिरो नसतात  ... पण तरी सुद्धा हार्ड वर्कींग असतात ,अपयशातून शिकणारी असतात, शिस्तप्रिय असतात...आणि त्यामुळेच शिक्षकांची, आई- वडिलांची अतिशय लाडकी असतात.. ..ती त्यांची 'शहाणी मुलं' असतात! अजिंक्यपण ह्याच कॅटेगरी मधला आहे. संध्याकाळी घरी आल्यावर हात पाय धुवून शुभमकरोति म्हणणारा आई बाबांचा शहाणा मुलगा!

हा शहाणा मुलगा तब्बल १६ टेस्ट मॅच बेंचवर होता. शेवटी चिकाटीच्या जोरावर भारतासाठी खेळलाच, बऱ्याचस्या मॅचेस गाजवल्यासुद्धा .. पण हा लेख त्याच्या करियरवर बोलण्यासाठी नाही .. त्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचंय, त्याची मेहनत आणि एकाग्रता त्याला खूप पुढंपर्यंत नेईलच ...ह्याबद्दल मला स्वतःला खूप आत्मविश्वास आहे आणि तसं वाटायला कारणीभूत झाली ती त्याच्याशी झालेली माझी ३री भेट !!

२०१५ ला ब्रेबॉर्न स्टेडियमवर आय पी एल ची प्रॅक्टिस सुरु असताना आमचे बंधू स्वानंद ह्यांनी ग्राउंडवर जाण्याची संधी दिली. साधारण २ तास थांबून प्लेयर्सची वाट बघत होतो. ग्राउंडवरच उभे असल्यामुळे अजिंक्यची नजर आमच्यावर पडली होतीच. प्रॅक्टिस झाल्यावर तो स्वतः आमच्या दिशेने आला, आम्हाला भेटायला....गेल्या १० वर्षातली ३री ,पण ह्या वेळेस एकतर्फी नसलेली ही आमची भेट. नेहमीसारखा शांत हसला. त्याचा डाऊन टू अर्थ अटीट्युड बघून हा सेलिब्रिटी वगैरे नसून हा आपला मावस भाऊ आहे कि काय असं फील मला आला! आणि त्या गडबडीत मी पटकन मराठीत बोलून गेलो- "लॉर्ड्स चे १०० ही खूप महान इनिंग होती!!"

 तो क्षणभर थांबला आणि बोलला 'थँक्स, पण आता पूढच्या मॅचेसवर फोकस करणं जास्त महत्वाचं आहे"

बास !! त्या एका वाक्यात मला समजलं १० वर्षांपूर्वी बघितलेला हा मुलगा किती परिपक्व आणि मॅच्युअर्ड आहे, तो मोठा खेळाडू होण्यासाठीच जन्मला आहे!! मुंबई क्रिकेटच्या संस्कारात वाढलेला.... सचिन, द्रविड,कुंबळे सारख्यानी पैलू पाडलेल्या अशा शहाण्या मुलांच्या हाती टीम इंडियाचं भवितव्य एकदम सुरक्षित आहे ह्याची खात्री पटली!!

Wednesday, April 19, 2017

आता सगळं संपलय!!!

आता सगळं संपलय (मार्च-२०१२)


साधारण १९९४-९५ चा काळ असेल... Cricket World मध्ये तेव्हा लारा , सचिन, इंझमाम असे "स्फोटक” batsman खेळत  होते....पण का कुणास ठाऊक मला तेव्हासुद्धा रोशन महानामा, चंदरपॉल, मांजरेकर ह्यांची batting बघायला जास्त मजा यायची..... त्याच काळात indian batting line up मध्ये जरा गडबड  झाली होती... अक्खा सचिन आणि थोडासा अझर सोडून बाकी कोणीच "फोर्मात" नव्हता आणि आपली टीम इंग्लंडला निघाली होती!! टीम अनाउन्स झाली...त्यात २ नावं होती १) सौरव गांगुली आणि २) राहुल द्रविड.... गांगुलीचा नाव १९९२ मध्ये at  least  ऐकल  तरी होता... पण द्रविड???? कोण आहे हा वगैरे प्रश्न मला पडला! दुसऱ्या दिवशी सकाळमध्ये द्रविड हा एक संयमी खेळाडू असून तो पुढे मांजरेकरची जागा घेईल असा लिहून आला!! ते वाचून माझ्यातला "unmatured " क्रिकेट fan  जागा झाला.. आणि मनात विचार आला कि हा कर्नाटकचा नवीन पोरगा मांजरेकरला वगैरे काय घंटा replace करणार! इंग्लंडमध्ये हा "edged  and  gone " होईल...

थोड्याच दिवसांनी..साधारण मे महिन्यात आपली टीम इंग्लंडला गेली....सचिननी 100 मारुनसुधा आपण 1st  टेस्ट match हरलो!   एवढंच नाही तर पुढची practice  match पण हारलो! दुसरी टेस्ट होती... "लॉर्ड'स"वर!! आणि अपेक्षेप्रमाणे टीममध्ये खूप changes  झाले...मांजरेकर आणि सुनील जोशीला बाहेर बसवून त्या ऐवजी गांगुली आणि द्रविडला टीममध्ये घेतला! practice  match मध्ये द्रविडनी 0 रन्स केल्यामुळे हा माणूस किती वेळ batting करणार हा एक प्रश्न होता! आपली 2nd batting होती....नयन मोंगिया out  झाला!(हा हा…! हो त्या वेळी कोणी ही ओपन करायचं) ...आणि गांगुली मैदानात आला! आल्याआल्या त्यांनी off side  आपली करून टाकली! तो रुबाब्दारपणे खेळत होता आणि दुसरीकडे आपली 5th विकेट पडली... आणि लॉर्ड'स च्या उंच आणि ऐतिहासिक pavilion मध्ये बाहेर आला तो एक शांत, हुशार आणि संतासारखा दिसणारा राहुल द्रविड! (ज्याच्याबद्दल फक्त वाचला होता, ज्याला मी उगाच शिव्या देत होतो अशा द्रविडला आज पहिल्यांदा पहिला होतं!!)थोड्याच वेळात गांगुली नी 100 मारले! तो out  झाल्यावर द्रविडनी tail enders न घेऊन जबरा batting केली....पण अचानक तो ९५ वर out  झाला! आणि माझा चेहरा पडला! match नंतर सगळीकडे गांगुलीबद्दल बरंच काही बोलला जाऊ लागला! पुढच्या टेस्ट मध्ये सचिन, गांगुली नी 100 मारले..आणि द्रविड 84 वर out !!! series  आपण १-० नी हरलो पण सगळीकडे चर्चा होती ती फक्त गांगुलीची!! खूप talented  असलेला द्रविड पूर्णपणे झाकोळलेला होता! आणि हीच गोष्ट कारणीभूत झाली  द्रविडबद्दल  "sympothy वाटायला!! जेव्हा जेव्हा लोक गांगुलीचा कौतुक करायची तेव्हा मी जाणूनबुजून द्रविडचा विषय काढायला लागलो! love at first sight  सारखाच love in first series  वगैरे झाला होतं मला!

हेच आर्टिकल द्रविडला मुंबईमध्ये प्रत्यक्ष भेटून दिलं... आयुष्यातला एक बाप क्षण
- इंग्लंडमध्ये छान खेळला होता... पण ९७-९८ मध्ये भारतात टेस्ट match होत्या...५-६ matches मध्ये तो १०० सोडा पण ५० सुधा एकदाच करू शकला...सुरवातीला आवडलेला हा माणूस "लांबी रेस का घोडा" वगैरे नाहीये कि काय असा वाटायला लागलं! पुढची tour  होती आफ्रिकेची!! टेस्ट series  सुरु झाली... पण हा पुन्हा fail  गेला..पहिल्या दोन्ही matches  मध्ये fail गेला... वाटला हा 3rd  टेस्ट हे त्याची शेवटची match  असेल! match सुरु झाली... विक्रम राठोड नावाचा आपला ओपनर out झाला....आणि द्रविड मैदानात! माझ्या पोटात गोळाच आला.... तो भयंकर concentration नी खेळत होता... दुसरया बाजूनी मोंगिया, सचिन out झाले...गांगुली आला..गेला...अझहर out झाला..लक्ष्मन retired झाला...पण द्रविड शांतपणे दुसरया टोकाला उभा होता....कुंबळे बरोबर partnership करत तो 90s मध्ये पोचला!! आणि 1st 100 मारले...ते ही आफ्रिकेमध्ये!!! मी जोरात ओरडलो....."YESSSS" हीच एक सुरवात होती.... मी द्रविडला "follow" करायला लागलो ह्याची!  same match second inning त्याने 81  मारल्या! हा त्याचा performance  बघून माझ्यातला "over -confidence " जागा झाला आणि द्रविड हा tough conditions मध्ये सचिन-अझर पेक्षा भारी खेळतो वगैरे मी ओरडायला लागलो!! खरं म्हणजे त्याला कारण पण तसाच होता कारण नंतरच्या series मध्ये साहेबांनी खूप consistent performance दिले..pudhchi 1 -2   वर्ष अशीच छान गेली...1 out झाला कि द्रविड येतो ..आणि मग आपण TV लाऊन match  बघत बसायचं.... असा एक calculation च होऊन गेला!.... RD  नी Australia ,  zimbabwe  against   खूप 50s मारल्या.... 100 होत नव्हते.... पण अजिबात वाईट नाही वाटला...त्याचा pitch वरचा presence ch हवाहवासा वाटायचा आणि अभ्यास / क्लास / शाळा बुडवायला भाग पडायचा! नंबर 3  म्हणजे द्रविड असा हळू हळू ठरुनच गेला होतं
मग आला New Zealand tour...  भयानक conditions ... RD फोर्मात असल्यामुळे मी निर्धास्त होतो! पण अंदाज चुकला!...द्रविड 1st टेस्ट match fail गेला...आणि शाळेत सगळे मित्र ..काय तुझा माणूस out झाला, झेपत नाही त्यालावगैरे म्हणून चिडवायला लागले! विशेष म्हणजे मला त्या गोष्टीचा वाईट नाही वाटला...उलट मजा आली....कारण लोकं मला "dravid fan  
" म्हणून ओळखायला लागली होती :) New Zealandच्या पुढच्या match मध्ये RD नी 190 आणि 123 मारल्या...आणि शाळेत, बिल्डींग मध्ये सगळीकडे RD चं कौतुक व्हायला लागला!! काही "दादा" लोकांच्या तोंडून ..द्रविडला मानलं बऱ का असा ऐकायला मिळाल्यावर एक वेगळाच आनंद झाला आणि excite झालो!!
World cup -1999 मध्ये 2 centuries मारल्यापण  नेहमीप्रमाणे RD बरोबर गांगुली आणि सचिननीपण century ... asusual RD च्या 100 पेक्षा बाकीच्यांच्याच 100 चं जास्त कौतुक झाला...त्याला आणि मला अजिबात फरक नाही पडला.... तो खेळत राहिला ..मी त्याचा खेळ बघत राहिलो...WC 1999 मध्ये तो highest scorer होता...पण कुठे हि फारशी चर्चा झाली नाही! (1996 मध्ये सचिन highest scorer होता तर त्याला " man of  the world cup " मिळाला होता!)  
99 -WC झाला...match fixing नावाची गोष्ट घडली....नंतर ऑस्ट्रेलिया tour आणि पुढची 1 -2 वर्ष खूप घाण गेली... मग Australia भारतात आले.... 1st टेस्ट आपण हरलो....द्रविड पुन्हा fail गेला..  पण second टेस्ट -calcutta  मध्ये follow on नंतर 180  ची "memorable इंनिंग" खेळला....आणि तो पुन्हा एकदा "आपला आधारस्तंभ" म्हणून ओळखू जाऊ लागला! 2003  WC ला "extra batsman " खेळवता यावा म्हणून त्यांनी wicket keeping केली!! नंतर england tourmadhe "as an opener " म्हणून आला.....  तो खरा team player होता! पण त्याच्यातला खरा माणूस दिसला तो "adelaide टेस्ट" मध्ये.... ऐतिहासिक match जिंकल्यावर त्यांनी सगळ्यात आधी indian cap ला "kiss " केला...आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं! ह्याच match मध्ये त्याच्या २०० झाल्या तेव्हा मला घरी सकाळी 5 वाजता congratss  करणारे calls आले!! मला खूपच मजा वाटत होती आणि तो अख्खा दिवस मी वेगळ्याच कॉन्फिदेन्चे आणि excitement मध्ये होतो!! नंतर त्याच्या career मध्ये खूप ups and down येऊन गेले!! पण तो एक matured player झाला होता आणि मी matured प्रेक्षक!! 
गेल्या काही वर्षामध्ये match result पेक्षा द्रविड कसा खेळला, किती खेळला हे जास्त interesting असायचं!! 2 -3 वर्षाच्या घाण फॉर्म नंतर २०११ RD नी गाजवला.... वर्षात 5 centuries   मारून 13000 रन्स पूर्ण केल्या!  2 वर्ष शांत गेल्यावर हे अक्खा वर्षभर मी दिवाळी साजरी केली! इंग्लंडमध्ये तर तो एकटाच चांगला खेळला ...त्याच्या performance overshadowed झाला नाही!! त्यामुळे match हरल्याचा वाईट अजिबात नाही वाटलं! RD वर आंधळा प्रेम करायला लागलो होतो! पण unfortunately हा आनंद जास्त दिवस टिकला नाही... Australia tour मध्ये  
त्याचा performance खूप गंडला! सर्वात वाईट होता ते त्याची ओउत होण्याचीपद्धत!! साहेब 6 -7 वेळा bowled झाले.... तेव्हा चाहूल लागली... आता सगळा संपतंय!!

जुलै   मध्ये पुन्हा एकदा टेस्ट मध्ये RD बघायला मिळेल... अशी अपेक्षा असताना द्रविड ने retirement announce केली!! 


आणि एका झटक्यात कळून चुकला कि आता सगळं संपलय!! 1996 -2012 ,असं 16 वर्षांचं नातं संपलय...

द्रविड  batting ला आल्यावर पोटात येणार गोळा.... तो खेळत असताना अभ्यास, काम सगळं सोडून TV किंवा cricinfo लावणं..... तो 90s मध्ये असताना अंधश्रधा ठेऊन एकाच खुर्चीवर बसून राहणं... तो लवकर out झाल्यावर दिवसभर होणारा mood off .... त्याचे 100 झाल्यावर आलेले SMS , phone calls!!!, त्याला खोटं out  दिल्यावर चिडून फेकून दिलेला TV चं रिमोट!!     


आता सगळं संपलय!! आता राहिलीये ती फक्त चिन्नास्वामी स्टेडीयम वरची 13000 विटांची भिंत!!!


Tuesday, April 18, 2017

आपण आणि रोमेश पोवार !!! (April 2009)

आपण आणि रोमेश पोवार !!! (April 2009) 

कदाचित आमच्या पोटाच्या साईझमध्ये किंवा बोलिंग स्टाईल थोडं फार साम्य असेल… नक्की कारण माहित नाही पण आपल्याला हा माणूस लई आवडायचा … 
त्याची ती सुटलेली ढेरी … वाढलेले गाल… सोन्याची चेन!! आणि अतिशय काळ्या रंगांच्या चेहऱ्यावर डार्क गुलाबी रंगाचा गॉगल!!! एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं!!! तरी पण आपल्याला लई आवडायचा… मुंबईच्या अनेक रणजी म्याच आपण पहिल्या ह्या माणसाखातर…. १०० किलो वजन घेऊन हा माणूस एक वेगळ्याच प्रकारे ऑफस्पिन टाकायचा…. चेंडू ला जादुई असा 'लूप' द्यायचा तो… आपल्याला लय बेस्ट वाटायच बोलिंग बघायला!! मुंबई आणि शेष भारत म्याच मध्ये द्रविड गांगुली ला लीलया out केलं होतं!!

त्यानंतर एका म्याच ला खास त्याला भेटायला गेलो …. मुंबईची पहिली bating आली म्हणून १ तास वगैरे ब्रेक फास्ट करत होता … आपण त्याला भेटलो आणि तडिक फोटो काढून घेतला….(शेजारी आगरकर होता … पण त्याला भाव न देत मी पोवार कडे गेलो म्हणून तो आजही माझ्याशी बोलत नाहीये) !!! 

(BTW हा फोटो अजिंक्य रहाणे नि काढलाय… पण तेव्हा तो 'रहाणे' आहे हे माहित नव्हतं !!!)

पवार साहेब मागच्या आठवड्यात निवृत्त झाले …. त्यांना आपल्याकडून tribute!!