आजकाल सोशल मीडियामुळे कधी , कुठं , काय पोस्ट बघून आपला मूड चेंज होईल सांगता येत नाही.. आजचीच गोष्ट बघा, सोमवार सकाळ.. म्हणजे आयटी कामगारांचा अगदी कष्टी आणि सर्वात दुखी दिवस.. त्यामुळे सकाळ सकाळ त्याच त्रासातून जात असताना साईड बाय साईड ,सवयीप्रमाणे इंस्टाग्राम उघडलं आणि ध्यानीमनी काही नसताना समोर आला- आमची खव्वयी मैत्रीण Gauri Deshpande नी पोस्ट केलेला 'सुजाता मँगो मस्तानी चा फोटो'
आणि काय चमत्कार, मंडे मॉर्निंगच्या लो वातावरणात अचानक चैतन्य सळसळू लागलं, सुरु असलेल्या मिटींग्स मध्ये मी जरा उत्साहात येऊन बोलायला लागलो.. मिटिंग मध्ये ब्रेक झाला आणि मी पुन्हा तो फोटो पाहिला.. सुजाता मस्तानीचा...!! त्यानंतर मीटिंग सुरु झाली, बराच वेळ चालली आणि संपली.. पण मी सुजाताच्या आठवणीतच पूर्णपणे रमलो होतो!
सुजाता आणि आपली ओळख तशी जुनी. साधारण ४-५ वर्षाचा असताना आई-बाबा आणि Dilip Madhukar Belekar काका ह्यांच्याबरोबर मी पेठेत गेलो होतो आणि तेव्हा सुजाताशी आपली ओळख झाली, पण ती तेवढ्यापुरतीच... सुजाताची खरी 'सवय' जी लागली ती कॉलेज मधेच... आमचे एक स्नेही ज्यांना कोंबडी, दारू अशा कशाचीच सवय नाही, असे - रोहन बोरावके , ह्यांना सुजाताचं मात्र फार मोठं व्यसन ..अगदी शाळेपासून!!! लहान बाळाला जसं लॉलीपॉप दिसल्यावर होतं एक्साक्टली तसंच इंनोसन्ट आनंद बोरवक्याच्या चेहऱ्यावर दिसत असे. ११-१२वि मध्ये असताना आम्ही वैशालीमध्ये ब्रेकफास्टला गेलो,तेव्हा आत शिरता शिरता समजलं वैशालीच्या गल्लीत सुजाता ची नवीन ब्रँच सुरु झालीये, आमचा बोरावके एकदम वेडापिसा झाला आणि साहजिकच पावलं वैशालीला डिच देऊन सुजाताकडे वळली..दोघांनी सकाळी १० वाजता १-१ मस्तानी मारली... पण समाधान झालं नव्हतं. खिसा तपासला तर दोघांकडची सुट्टी नाणी मोजून अवघे २० रुपये होते.. आम्ही त्यामाणसाला हात पाय जोडून खूप विनंती करून हाल्फ मस्तानीचं वन बाय टू द्यायला लावली .. तेव्हाच कळलं सुजाताला भेटायला वेळ काळ बघावं लागत नाही... काही कारण हि असावं लागत नाही... इथूनच आमच्यात एक नातं सुरु झालं.
नंतर सुजाता आमच्या कोथरूड मध्ये पोचली.. अगदी घराशेजारी... फारच फ्रीक्वेन्टली भेटायला लागलो. हळू हळू हे व्यसन घरी पोहोचवL. आमचे बंधू Swanand आणि वाहिनी Janhavi ह्यांना पण सवय लावली. पण ते पुणेरी स्वभावाचे.. उगाचच आपलं वेगळं आहे असं म्हणत चॉकलेट, ड्राय फ्रुट मस्तानी वगैरे प्यायचे. पण आपलं तसं नाही. सुजाता म्हणजे मँगो मस्तानी हे आपलं समीकरण आपण कधी बदललं नाही. अगदीच क्वचित सिझन असला कि मँगोला दगा देऊन आपण सीताफळ मस्तानी घेत असे... पण ते तेवढ्यापुरतेच!! शेवटी मँगो ती मँगो!!
नंतर थोडा अजून वय वाढलं! शिंगं फुटली.. उगाच डाएट , कॅलरीचा वगैरे विचार करून फुल्ल मस्तानी घेणं बंद केलं. काही वर्षांनी लग्न करायचं ठरवलं. पण आयुष्यात फक्त सुरमई ,वैशाली,रुपाली ,सुजाता ह्यांच्यावरच प्रेम केल्यामुळे लग्न मात्रं अरेंजच करावं लागणार होतं. Rashmi
भेटली, गांगलांच्या ह्या 'स्थळाला' गुडलक आणि सुजाता दोघंही खूप आवडतात हे ऐकल्यावर आपण होकार देऊन टाकला होता...आणि आता पाटणकरांची पुढची पिढी म्हणजे आमचे पुतणेसाहेब 'जय' वयाच्या ४ थ्या वर्षी मँगो मस्तानी मागून मागून खातो तेव्हा मात्र मनात कुठंतरी सार्थक वाटतं!!हीच ती पोस्ट!! |
हे सगळे असेच संपवलेले मस्तानीचे ग्लासेस, मनाच्या एका कोपऱ्यातून की-बोर्डवर येत असताना, पुन्हा एकदा मँगो मस्तानीनी काठोकाठ भरलेला ग्लास डोळ्यासमोर आला, सोबत चमचा आणि स्ट्रॉ पण घेऊन आला. त्याला हातात घेतल्यावर झालेला तो वेगळाच आनंद, अतिशय वेड्यागत खुश होऊन 'आधी चमच्यानी खाऊ का स्ट्रॉनी पिऊ' ह्यात झालेला भाबडा गोंधळ. मग सरळ एक घास चमच्यातून घ्यायचा, ज्या मध्ये कापसापेक्षाही अतिशय सॉफ्ट असं आईसक्रिम असतं आणि ते जिभेवर पडल्या क्षणीच विरघळून जातं आणि दुसरा सिप स्ट्रॉ मधून घ्यायचा. आणि हि अशा पद्धतींनी आपली सुजाताबरोबरची डेट सुरु ठेवायची!!! ग्लासमधला तो चविष्ट थिक शेक स्ट्रॉपर्यंत येता येता आईसक्रीमचा स्पर्श होऊन मस्त थंड होऊन जातो आणि मग थेट आपल्या गळ्यामध्ये विसावून जातो.. हे आईस्क्रिम आणि शेकची पार्टनरशिप आपला जीभ,गळा,पोट आणि साहजिकच आपल्या मनाला सुखावून जाते. मोदीजी जितक्या वेळा 'मित्रो' म्हणतात त्याहून जास्त वेळा आपण 'वाह, वाह' म्हणत मस्तानी संपवतो.
ग्लास मधली सुजाता ९९% संपलेली असते, पण तिच्या प्रेमात पडलेलं आपलं मन काही तिला सोडत नाही. आणि ग्लासमध्ये उरलेली ती १% एवढी मस्तानी संपवण्याचा हट्ट आपण करू लागतो. स्ट्रॉ घेतो आणि आईस्क्रीम विरघळून मधुर झालेला आणि ग्लास च्या तळाला गेलेला तो शेक , आपण अतिशय निरागस मनानी 'फुर्रर फुर्रर' आवाज करत संपवतो.. शेजारच्यांना किती घाण वाटलं तरी एक लक्षात ठेवायचं असतं..
मस्तानी पिताना मॅनर्स वगैरे कधीच पाळायचे नसतात!! बाकीचे गेले उडत... सुजाता आणि आपण एकमेकात गुंतायचं असतं, आपलं सुख आपणच एन्जॉय करायचं असतं!
पुढची मीटिंग सुरु व्हायच्या आधी एकच सांगतो , मिस यु सुजाता!!!!!!!
ता.क.- टेकनॉलॉजी खूप पुढं गेलीये, पण पुण्याबाहेर राहून पण सुजाता ची मँगो मस्तानी जेव्हा डेटा ट्रान्स्फर सारखी आपल्या कडे येईल तीच खरी प्रगती!!
great work ..
ReplyDelete(Y) Keep writing. .. ... ;)
ReplyDelete