Tuesday, April 18, 2017

एक समाधानपूर्वक स्वगत!!!

मी कधी चित्र काढली नाहीत... आणि कधी विकत पण घेतली नाहीत .. एवढंच काय एकूणच स्वभाव तिरकस आणि जन्माचा कोकणस्थ असल्या मुळे चित्र /पेंटिंग्स  विकत वगैरे घेण्याचा खिसा/ ती नजर आपल्या कडे कधी नव्हतीच... पण 
गेला एक दीड वर्ष रश्मी नि तिचा पेंटिंग पुन्हा सुरु केलं आणि ते बघता बघता सर्व कलाकारांविषयीचं मत पूर्ण बदलून गेलं, त्यांच्या बद्दलचा आदर खूप वाढला ..असो .. रश्मी ची हि फक्त सुरवात आहे अजून खूप गाठायचं आहे सो तिचं कौतुक करण्यासाठी हा सारा लेख नाही... 
रश्मीनी रेखाटलेला जोकर निरखून बघताना एक छोट्या  
गेल्या ३-४ महिन्यात अनेक जणांना आर्ट गॅलरीमध्ये पेंटिंग निरखून बघताना पाहिलं.. त्यांना छोट्या छोट्या गोष्टी डोळे भरून बघाताना खूप वेगळंच वाटायचं आणि आश्चर्यसुद्धा.. 
गर्लफ्रेंडसाठी व्हॅलंटाईनडेचं गिफ्ट   
पण गेल्या शुक्रवारी एक यंग .. कॉलेज मधला कपल गॅलरी मध्ये आलं होतं...  कपल मधल्या मुलीचं रश्मीच्या बैलावर लक्ष गेलं...  आणि तिथेच उभी राहिली किती वेळ.. बैलाचे डोळे ,कान, कानातल्या माळा सगळ्या गोष्टी बघत होती , प्रत्येक गोष्ट तिला भारी वाटत होती ...आणि मी काहीतरी भारी शोधलंय हे तिला तिच्या बॉयफ्रेंड ला सांगायचं होतं... त्याला तिनं बोलावलं आणि तो सुद्धा त्याच उर्जेने ते चित्र बघू लागला... हे यंग पब्लिक फक्त टीपी करतं काही विकत घेत नाही  अस आमचा आधीचा अनुभव होता त्यामुळे हे दोघा काही विकत घेतील असा काही अपेक्षा आम्हाला नव्हत्याच आणि घडलं पण तसंच... ते दोघे खूप  वेळ बघून निघून गेले... १०-१५ मिन नि बघतो तर काय ते पुन्हा आले .. पुन्हा त्याच नजरेनी ते चित्र पाहिलं... किंमत पहिली.. आणि गेले ... काही वेळानी ती एकटी आली ... चित्र पाहिलं पुन्हा गेली..  ती दुसरीकडे बिझी असताना तिचा मित्र आला किमंत आणि चित्र बघितलं.. रश्मीचं कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले म्हणला मी फोन करिन ... बोलबच्चन टाकतोय असं वाटलं.. फायनली ते दोघ पुन्हा एकदा आले भेटले आणि गेले ... मी त्यांच्यावर नजर ठेवूनच होतो... तो मुलगा इतका प्रेमात पडला होता बैलाच्या कि तो मेन गेट वरून परत आला आणि म्हणलं ATM शोधतो आणि येतो!! रश्मी आणि मला दोघांनाही वाटलं त्यांनी विकत नाही तरी चालेल पण ही त्यांची रिअक्शन खूप मोलाची आहे!! जवळपास atm नसल्यामुळे आम्ही तो येईल अशी अपेक्षाच ठेवली नव्हती ...गॅलरी बंद व्हायच्या सुमारास ..अचानक तो पळत पळत आला आणि सांगितलेल्या किमती पेक्षा थोडे पैसे त्याला कमीच मिळाले ATM मध्ये म्हणून ३-४ वेळा सॉरी म्हणलं... बाहेर -२ टेम्परेचर असताना हा मुलगा पळत वगैरे ATM मध्ये गेला ..हे बघूनच आम्ही गारद झालो होतो... आम्ही अगदीच हसून त्याला ते चित्र दिलं आणि त्याच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता त्याला तोड नव्हती.. आम्हाला पण फार भारी वाटलं ... पण गोष्ट इथं संपत नाही...  वॅलेंटाईन डे च्या दिवशी रात्री अचानक रश्मी ओरडली ...  फेसबुकवर तिला एका अनोळखी मुलीनी टॅग केलं होतं , तिनी बैलाच्या चित्राबरोबर फोटो काढून तो फेसबुक वर टाकला होता ....  मग आम्हाला समजलं आर्ट गॅलरी मधल्या त्या मुलानी, तिच्या नकळत ते पेंटिंग घेतलं आणि व्हॅलंटाईन डे तिला सरप्राईज दिला होतं !! 

पहिल्या पगाराचा आनंदी वाघ 
तसेच काहीसा आज पुन्हा झालं.. आज मोठं प्रदर्शन नव्हतं पण आर्ट गॅलरीच एक छोटं फंक्शन होतं म्हणून आम्ही तिकडे गेलो होतो आणि नेहमीप्रमाणे आपल्याच पेंटिंग्स जवळ उभे होतो.. इतक्यात एक आई , वडील एक मुलगा आणि मुलगी  अशी छोटी फॅमिली आली... ती पण फंक्शन लाच आलेली होती , वेळ होता म्हणून सगळी चित्र बघत होते... त्यातला मुलगा , साधारण २२-२३ चा असेल.. त्याला रश्मीचा वाघ भयंकर आवडला.. अतिशय आवडला... तो फंक्शन बुडवून आमच्या इकडेच घुटमळत राहिला... आई बाबा ओरडले कि त्यांच्याकडे जायचा पुन्हा ५-१० मिन नि यायचा असा त्यांनी २ तास केलं... यायचा , चित्र बघायचा , पाकीट चेक करायचा आणि जायचा.. साधारण २ तास विचार करून त्यांनी निर्णय घेतलं ... मला हे आवडलय मी हे घेणार.  खिशात पैशे नव्हते पुरेसे , त्याच्या वडिलांनी त्याला ऑफर केले पण ते न घेता बाहेर गेला, ATM मध्ये जाऊन आणले आणि ते चित्र घेतलं... आणि घेतल्यावर खूप ओरडला... 'माझं स्वप्न आहे माझ्या घरात वर्ल्ड क्लास आर्टिस्ट च्या गोष्टींचं कलेक्शन असेल... आणि आज माझ्या पहिल्या पगारातून मी तुमच्या पासून सुरवात केली आहे..' हे ऐकल्यावर पोटात पटकन गोळाच येऊन गेला... 
 अक्ख्या गॅलरी मध्ये तो सगळ्यांना पेंटिंग दाखवत सुटला... एवढाच नव्हे गॅलरी मधून बाहेर पडल्यावर पेंटिंग डोक्यावर घेऊन नाचत नाचत पार्किंग पर्यंत गेला!!





तर ..माझ्या सारख्या कोरड्या माणसाला ह्या  दोन अनुभवांनी फार हलवूनच टाकलं.. 
आपल्या घरात निर्माण झालेली गोष्ट कोणा एका जोडप्यासाठी प्रेमाचं प्रतीक वगैरे बनलीय किंवा पहिल्या पगाराची साक्ष  बनलीये हाच किती बाप प्रकार आहे .. 
ह्या पुढे व्हॅलेंटाईन डे त्यांना रश्मीची आठवण होणार आणि आम्हाला त्यांची...असा नकळत,ओळख नसली तरी एक वेगळाच नातं जोडल जातं... 

चित्र काढणं काय किंवा ते विकत घेणं काय... 
ते फक्त  एक 'transaction' नाहीये ...ते त्याच्या फार पलीकडची गोष्ट आहे!  ते  एक इमोशनल एक्सचेंज  आहे... जेव्हा बैल विकला गेला तेव्हा रश्मीला  वाईट वाटलंच असणार.. पण घेणाऱ्याच्या चेहऱ्यावरच्या स्माईल मुळे ते दुःख पुसलं गेलं असणार... 

चित्र काढणाऱ्याच जेवढं कौतुक असतं तसाच ती गोष्ट प्रेमळ नजरेनी बघणं, त्याचा अर्थ समजून घेऊन त्याच्या प्रेमात पडणंचांगला प्रेक्षक मिळणं  हे फार महत्वाचं आहे...  आणि आजकालच्या जगात जेव्हा सो कॉलड 'बिघडलेल्या ' २०-२२ वर्षाच्या पोरांकडून असा कौतुक होतं तेव्हा ते अजून भारी वाटतं !!  

एक प्रकारचं समाधान मिळतं!! 

2 comments: