आम्ही दोघी - नॉट जस्ट अ टिझर रिव्यू!
बर्फाचा गोळा खाणारी, शाळेत जाणारी, लहानगी, गोंडस पण बिनधास्त अशी सावित्री म्हणजेच प्रिया बापट आणि तिच्या समोर ... गुलाबाच्या पाकळ्याचं ग्रीटिंग कार्ड बनवणारी , थोडी बुजरी , खूप काही बोलायचंय पण लाजणारी असे असंख्य भाव डोळ्यांमधून आपल्यासमोर अलगद सोडणारी आमला म्हणजे मुक्ता द ग्रेट.... साधारण १ मिनिटाच्या टीझरमध्ये ह्या दोघी आपल्याला बरंच काही सांगून जातात...
'आम्ही दोघी' नावाच्या भावनांच्या पोत्यात.... 'गुंफलेल्या नात्यांच्या बऱ्याच गोष्टी' दडलेल्या आहेत ह्याची प्रचिती नक्की देतात...
*टिझर बघायला इथे क्लिक करा
मुळात , पिक्चरचं टिझर असो वा ट्रेलर, ते अरेंज मॅरेज सारखं असावं. एखाद्या अरेंज मॅरेजमध्ये कसं छान सरप्राइझेस देऊन नातं अगदी अलगदपणे उलगडत जातं ... एक्साक्टली तसंच आहे आम्ही दोघीच टिझर!
गेल्या महिनाभरात पोस्टर्स रिलीझ करून मुक्ता आणि प्रिया ह्यांचा इंटरेस्टिंग लूक रिव्हिल केला होता.... त्यातच आज टिझरमध्ये शाळेत जाणारी प्रिया दाखवून माझ्यासारख्याना अनेकांना गोड सरप्राईज दिलंय... छोट्या गोष्टी अशा अचानक उलगडत गेल्या कि नात्याची मजा वाढते ...तसंच प्रेक्षकांना सिनेमाबद्दलची ओढ अजून वाढवते.. तोच अपेक्षित परिणाम साधला जातो ह्या १ मिनिटाच्या प्रोमोमध्ये!
पोस्टरमध्ये दाखवलेली मॅच्युअर्ड प्रिया आणि टीझरमध्ये दिसणारी बारीक केस ठेवलेली , विचारात गुंग असलेली आणि दोन वेण्या घातलेली, शाळेच्या युनिफॉर्ममध्ये अक्षरशः बागडणारी प्रिया ... किती सहजपणे ती व्यक्तिरेखेमधला फरक दाखवून देते... कष्ट घेऊन खास असा प्रयत्न करतीये असं वाटतच नाही.
"एकदा वाटलं ना कि करून टाकायचं.. म्हणजे हळहळ वाटत नाही" अशी एकदम बिनधास्त वागणारी ही प्रियाने साकारलेली सावित्री... मनात येईल तसं वागणारी एकदम बिनधास्त...! तिच्या अशा बिनधास्तपणाकडे कुतुहुलाने बघणारी, आपण कष्टानी शिवलेल्या स्वेटरच्या बाह्या प्रियाने कापल्यावर चेहऱ्यावर कसलाही राग न ठेवणारी.... मनातल्या मनात खूप कौतुकानी ... खरं तर प्रेमानी सावित्रीकडे बघणारी ही अमला.... अख्या टिझर मध्ये एकही डायलॉग नसून सुद्धा मुक्ता तिचे डोळे , बॉडी लँगवेज मधून प्रेक्षकांशी बरंच काही बोलून जाते.. इथेच (पुन्हा) दिसून येतो तिचा ग्रेटनेस..
सहजता आणि दिग्गज अशा दोघीना एकत्र आणणाऱ्या, दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या प्रतिमा ताईंच्या आतला कॉस्च्युम डिरेक्टर मात्र काही स्वस्थ बसत नाहीये असं वाटतंय... दोघींचे कॉस्च्युम दोन्ही भिन्न कॅरेक्टर्स एकदम ठामपणे दर्शवतात... अगदी त्या फाडलेल्या स्वेटर सकट! बाकी ह्या दोघींशिवाय अजून कलाकार कोण हे पण गुलदस्त्यातच आहे ... अर्थात ह्या दोघी बॅटिंग करत असताना बाकी प्लेयर्स कोण हे विचारणं म्हणजे मूर्खपणाच ठरावा...
भाग्यश्री जाधव ह्यांच्या संवाद लेखनाने कमाल केली आहे असं एकंदर जाणवतंय ... पिक्चरचा टोन पकडून,कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थपूर्ण असे डायलॉग्स ते सुद्धा अतिशय साध्या भाषेत... सामान्य प्रेक्षकाला कळणारे आणि त्यामुळेच एकदम भिडणारे असे संवाद...!!
अतिशय कल्पकतेने बनवलेल्या ह्या टीझरमध्ये आपल्याला खूप काही दिसतं...छान लोकेशन्स, सुंदर डायलॉग्स , बोलक्या डोळ्यांची मुक्ता, लहानपणीची आणि मोठी झालेली प्रिया .... आपल्याला अनेक गोष्टी दिसतात.... पण तरीसुद्धा सिनेमा नक्की कशावर बेतलाय हे गुपित एकदम सरंक्षितपणे गुपितच राहतं ... टिझर संपल्यावर असं नक्की कुठलं नातं ह्या दोघींमध्ये गुंफलं गेलंय ह्याचाच विचार प्रेक्षक करत राहतो.. आणि इथेच हे १ मिनिटांचं टिझर जिंकून जातं आणि १६ फेबची वाट बघायला भाग पाडतं!
ता . क. -
बऱ्याचवेळा लग्नाच्या पत्रिकांमध्ये "आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हां - चिंटू , पप्पू, मिनी" वगैरे लिहिलेलं असतं... त्या चिंटू पप्पूला आपली वाहिनी कोण ए, तिचं नाव काय , लग्न कसं ठरलं वगैरे काहीच माहित नसतं ...त्यांना काही घेणंदेणं नसतं. पण त्यांना तो दादा लै आवडीचा असतो... त्यांचा एकदम वीक पॉईंट .. आणि म्हणूनच ते आरडाओरडी करत आमच्या दादाच्या लग्नाला यायचं हां म्हणत असतात....
माझं पण काहीसं तसंच झालंय ... पिक्चर नक्की काय आहे , स्टोरी काय आहे वगैरे काहीही माहित नाही पण तरी सुद्धा (अनेकांसारखा) प्रिया आणि मुक्ता म्हणजे आपला वीक पॉईंट ... म्हणूनच आपण जगाला ओरडून सांगतोय २३ फेबला ह्या 'फॅब दोघी' थिएटर मध्ये जाऊन बघाच!!
ह्याच सिनेमाचं पाहिलं पोस्टर रिलीज झाल्यावर लिहिलेलं मनोगत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
- स्वागत पाटणकर!
No comments:
Post a Comment