गाजर का हलवा ,आलू के पराठे - मराठीतले
आई लोकांच्या घरची कामंवगैरे करून अतिशय कष्ट घेत पोराचं पोट भरतीये पण पोरगं बाहेर चोऱ्या करत बसलंय किंवा मुलगा खूप दिवसांनी घरी येतोय आणि घराबाहेर हेलिकॉप्टरमधून उतरल्या उतरल्या असा आईच्या डोळ्यात अचानक गंगेला पूर आल्यासारखं पाणी वाहायला लागलंय.... हे असं काही फिल्मीवगैरे न करता एकदम सहज सॊप्या पद्धतीनी मनावर उतरणारी आई-मुलाचं निर्मळ, प्रेमळ, सुंदर असं नातं पडद्यावर सहजतेने दाखवणारी 'आई-मुलाची' एक जोडी २०१७नी आपल्या मराठी इंडस्ट्रीला दिली.. कुठलाही अतिरंजितपणा न करता आई-मुलाचं ते ओलं नातं दाखवणारी एक जोडी... अमेय वाघ आणि चिन्मयी सुमीत!
काही महिन्यांपूर्वी आलेल्या मुरांबामध्ये, चिन्मयी आणि अमेय हे आई-मुलाच्या भूमिकेत दिसले. दोघेही एकदम कसलेले कलाकार, अभिनय अंगात भिनलेला त्यामुळे 'मुरांबामधला आलोक आणि त्याच्या आई'च्या नात्यामध्ये कुठलाही कुत्रिम फॅक्टर नव्हता. नैसर्गिक... एकदम जिवंत अभिनय..खरं सांगायचं तर कुठेही ते 'अभिनय' करतायेत असं जाणवलंच नाही... आलोकची चिडचिड आणि आईची काळजी हे एकदम आपल्या घरातलाच सीन आपण पडद्यावर बघतोय कि काय इतकं खरं! चिन्मयीनी केलेली आई आणि अमेयनी साकारलेला मुलगा ही ऑनस्क्रिम केमिस्ट्री लैच आवडून गेली.... आणि कदाचित त्यामुळेच सध्या धुमाकूळ घालणाऱ्या फास्टर फेणे मध्ये ही जोडी छोटंसं का होईना पण पुन्हा गोड दर्शन देऊन गेली आणि मराठी इंडस्ट्रीला नवीन हिरो व नवीन हिरोला तेवढीच तगडी आई मिळालीये असं वाटून गेलं!
अमेय वाघ म्हणजे सळसळत्या उत्साहाचा एक उत्तम नमूना...तो आपल्या पुण्याचा आणि त्यातच माझ्याच कॉलेजचा. त्यामुळे त्याचा कॉलेज अभिनेता ते फेणे हा त्याचा प्रवास एकदम जवळून बघायला मिळाला... आणि त्यामुळेच त्याच्याबद्दल बोलताना कधीही कोकणस्थीपणा आडवा येत नाही.. भरभरून कौतुक केलं जातं आणि अर्थातच तो तेवढा कौतुकास्पद आहेच. त्याच्या करियरमधल्या दोन मोठ्या शिड्या त्यानी आलोक आणि बनेश फेणेच्या रूपात पार केल्या आहेत. मध्यमवर्गीय संस्कार असलेला, एवढं यश एकदम मिळूनसुद्धा जमिनीवरच पाय असणारा असा हा अमेय.....
आणि.....
अमेयसारख्या अतिशय गुणी अशा कलाकाराला मोठं होताना बघून जितका आनंद आम्हा बीएमसीसीकराना होतो , जेवढं प्रेम आम्ही त्याला देतोय तेवढंच प्रेम - आशीर्वाद हे अमेयसारख्या नवीन कलाकारांना देणारी, दुसऱ्यांना नेहमीच प्रोत्साहन देणारी अभिनेत्री म्हणजे चिन्मयी सुमीत! हिचं एका शब्दात वर्णन करायला सांगितलं तर लगेच उत्तर येईल 'मायाळू'! सोशल मीडियामुळे विचारांची देवाण घेवाण फार सोप्पी झालीये आणि त्यामुळेच प्रत्यक्ष न भेटलेली चिन्मयी ही ओळखीची झाली... आणि कुठल्याही गोष्टीवर नेहमी पॉझिटिव्हपणे व्यक्त होणारी चिन्मयी ही कळायला लागली!स्वार्थी हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाकणारी, सह-कलाकारांना आपली फॅमिलीच बनवणारी , भयंकर जीव लावणारी अशी ही चिन्मयी सुमीत...
माणसाचं मन चांगलं असलं ना कि आपोआप त्याच्या हातून चांगली कामं होत जातात.. चिन्मयी आणि अमेय हे दोघेही त्याच कॅटेगरीमधले! हाच चांगुलपणा त्यांच्या अभिनयात उतरला असावा आणि त्यांनी साकारलेल्या भूमिकांमध्ये एक जिवंतपणा येत असावा. कदाचित ह्यामुळेच बनेश फेणेसारख्या व्रात्य असलेल्या मुलांच्या आईला ह्या 'टोण्याची काळजी करू का कौतुक' हे चिन्मयीनी बोललेले शब्द स्वतःचेच वाटतात ... किंवा मुरांबामध्ये आलोक जेव्हा आईला वेडा-वाकडा... वाट्टेल तसं बोलतो तेव्हा प्रेक्षागृहातील आईच्या मनात आधी राग आणि दुसऱ्या सेकंदाला डोळ्यात पाणी आलेलं असतं ... आणि नेमके तेच भाव पडद्यावर चिन्मयीच्या डोळ्यात असतात! अभिनय जिवंत वाटायला अशा ड्रॅमॅटिक सीन्सची गरजच नसते... साध्या नॉर्मल सीनमधलं पण साधेपण टिकवणं फार महत्वाचं असतं.. आणि तेच बरोबर जमतं ह्या दोघांना.... उदाहरण म्हणजे मुरांबामध्ये... एका सीनमध्ये आई म्हणजेच चिन्मयी डोसे हवेत का असं अमेयला विचारते तेव्हा पटकन असं वाटतं कि आपणही त्यांच्या किचनमध्ये जावं आणि आईच्या हातचे डोसे खाऊन यावं! इतका तो सहज अभिनय आपल्यासमोर सादर केला जातो...रीमाताईंच्या नंतर एक तगडी आई मिळालीये चिन्मयीच्या रूपात...
ह्या दोघांना एकत्र स्क्रीनवर आणणाऱ्याला खूप मोठं धन्यवाद! |
आपल्या हिंदी इंडस्ट्रीमधल्या आई एक्सपर्ट असते ती २ गोष्टींमध्ये- गाजर का हलवा - आलू के पराठे....
मुलगा घराबाहेर कुठेही निघाला की ती हे एवढंच मुलाला प्रेमानी देत असते. मला तर चिन्मयी - अमेयची जोडी ही 'गाजर का हलवा - आलू के पराठे' सारखीच वाटते... म्हणजे ... अभिनय क्षेत्रात किसून किसून ...सॉरी कसून-कसून मोठी झालेली, गाजरहलवा सारखीच लाल गालांची ... गोडवा मुरलेली ...अशी चिन्मयी आणि आलू के पराठ्यासारखा सगळ्यांना आवडणारा अमेय .... बटरचा तुकडा विरघळून जावा तसंच मुलींचं मन विरघळवून जातं असा हॉट फेणे उर्फ अमेय!
लक्ष्या - अशोक सराफ, स्वप्नील-मुक्ता अशा अनेक हिट मराठी जोड्या .... तसंच बॉलिवूडचा टायगर आणि रीमा ह्यांच्या एवढीच आपला 'वाघोबा आणि चिन्मयीची' माय - लेकाची ही जोडी सुपरडुपर हिट होवो आणि आम्हाला सारखी सारखी भेटत राहो हीच प्राथर्ना!!
- स्वागत पाटणकर
Pustak chhap ata hya sagalya blogs cha
ReplyDelete:) :) Ek number Dipti! Thank u
Deleteझक्कास रे ������
ReplyDeleteक ड क
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete